Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Vinita Kadam

Others

3  

Vinita Kadam

Others

भाकर

भाकर

1 min
11.7K

पाहे शेतकरी डोळा 

मृग आता बरसेल

रानी हिरवं सपान

माझे शीवार फुलेल ||१||

मोती आपल्या घामाचे

काळ्या मातीत सांडून

जीवनाच्या जुगारात

देतो स्वत:ला झोकून ||२||

जीव मुठीत घेऊन

त्यानं पेरलं जोंधळं

आस एकच मनात

येई भरून आभाळं ||३||

आता हसता शीवार

मिळे सुखाची भाकर

त्याच शीवारात लेक

माझा धरील नांगर ||४||

मृग नक्षत्र रूसता

राजा वरूण कोपला

सारा संसार त्यानेच

काळ्या मातीत पुरला ||५||

मृग गेला कोरडाच

नेत्री आसवांचा वास

कधी नाहीच पडला

तोंडी भाकरीचा घास ||६||

दिवास्वप्ना जाग आली

वांझोट्या या नशीबात

शिवार ही लटकले

दोर बांधून गळ्यात ||७||

Rate this content
Log in