भाग्य की प्राक्तन
भाग्य की प्राक्तन
1 min
302
त्या क्षितीजाच्या टोकावर काही
खूणा अस्ताव्यस्त पसरल्यात आणि
काही विखुरलेले श्वासही
तिथंच जवळपासच घुटमळताना दिसले
त्याच्या नकळत वेध घेत असताना
असं लक्षात आलं
तूही तिथंच राहून
निशःब्द छायेला कवटाळून न्
शांततेच्या गुहेतच राहून
स्वतःच स्वतःच्या परिघातून मुक्त होऊ पाहतेस आहेस
आणि ओंजळ सुखाची
आकाशाला अर्पण करतेयस
विखुरलेले श्वास कुठल्याश्या
समांतर रेषेत आणण्यासाठी
केविलवाणी धडपड करतेयस
तुझी ती सारी धडपड
इथं उभारून अनुभवतोय
तुझी तिथली धडपड आणि
माझी इथली धडपड
खरंच समांतर आहे
याला म्हणावं तरी काय ??
भाग्य ...
प्राक्तन ...
की
आणखी काही ......
