STORYMIRROR

Supriya Devkar

Others

3  

Supriya Devkar

Others

बघ करून धाडस

बघ करून धाडस

1 min
225

मान वर करून

बोलली नाहीस कधीच

डोईवरला पदर ही

ढळू दिला नाहीस कधीच

शब्दांना उलट शब्द

केला नाहीस कधीच

संतापाने संयम

सुटला नाही कधीच

वाटत नाही का तुज

झिडकाराव हे सारं

वाहू द्याव धमन्यांमधून

स्वातंत्र्याच हे वारं

बघ करून धाडस

घे जरा मोकळा श्वास

दरवळू दे सर्वत्र

तुझ्या कर्तृत्वाचा सुवास

सुप्रिया देवकर.


Rate this content
Log in