बेरंग
बेरंग
1 min
468
जिवनाच्या कॅनव्हासवर तू
सजवलेलं होतस रंगीत चित्र
त्याच्या सोबत घालवलेस
किती दिवस आणि रात्र
तू दिलेस झोकून स्वताला
त्याच्या निखळ प्रेमात
नाही केलीस कसूर कधी
त्याच्या सोबत कामात
नाही जमले त्याला कधी
तुझ्या प्रेमात रमणे
बेरंग झाल्या जिवनाचा
शिल्पकार स्वतःला नेमणे
ओळख तुझी विसरून गेला
रमला नव्या नात्यात
आठवणींना नेमले त्या
साठवणीच्या खात्यात
