बेडी आणि बंधन
बेडी आणि बंधन

1 min

12.1K
फ्रेंडशीपचा बँड म्हणाला
राखीला मोठ्या तोऱ्यात,
“गाठ सैल तुझी,
जीव उरला नाही दोऱ्यात!
कुरियर ते व्हॉटसऍप
तुझी झाली अधोगती,
ऑनलाईनच्या जमान्यात
झाली ऑफलाईन नाती-गोती.
तुझे 'बंधन' झाली बेडी मात्र
बँडची ब्रँड व्हॅल्यू वाढली,
माझ्यासाठी हात पुढे,
मात्र राखीची बेडी काढली
राष्ट्रीय सणाचं गांभीर्य
उथळ ‘डेज’नाआलं,
परंपरागत तुझ्या सणाचं,
ग्लॅमरच कमी झालं.”
राखी सगळं ऐकून म्हणाली,
"भावा-बहिणीचं प्रेम निरंतर
जशी संथ नदीची खोल धार
फ्रेंडशीप फ्रेंडशीप म्हणजे बऱ्याचदा
उथळ प्रेमाचा खळखळाटच फार!"