बदला जीवनशैली
बदला जीवनशैली


सध्या विश्वात आहे वारा,
जिकडे बघावे तिकडे हाहा:कार सारा।
यावर एकच मार्ग सांगतोय खरा,
बदला जीवनशैली, रोग होईल बरा।।१।।
दुरून नमस्कार, नको हस्तांदोलन,
ना गळाभेट, नको ते आलिंगन।
ना पाहुणचार, नको सहभोजन,
बदला जीवनशैली, करा कोविडचे दहन।।२।।
नियमित व्यायाम, संतुलित आहार,
सूर्याचे किरण, स्वच्छतेचा आधार।
अन्न खा ताजे, वाढवा शक्ती प्रतिकार,
बदला जीवनशैली, करा कोरोनावर वार।।३।।
शॉर्टकट जीवन झालं, लय-लय भारी,
शरीरबंद वस्त्रे घाला, येणार नाही स्वारी।
पिझ्झा-बर्गरची, होऊ द्या दुनियादारी,
बदला जीवनशैली, वाचवा महामारी।।४।।
लसीकरणाची सध्या, वाट नका पाहू,
कोरोनासोबत जगण्याची, सवय आपण लावू।
अरिष्टांच्या वेळी विज्ञानच लागते धावू
बदला जीवनशैली, संपवा कोरोनाचा बाऊ।।५।।