बचतीचा मंत्र..
बचतीचा मंत्र..
1 min
11.8K
थेंबे थेंबे तळे साचे
मंत्र बचतीचा खरा
उद्याच्या स्वप्नांसाठी
मार्ग बचतीचा धरा.
तरतूद आजची ठरते
तजवीज हो उद्याची.
संकट आले कसलेही
खात्री निभावून जायची.
मिळकत चार पैशांची
जरा वापरा जरा साठवा
अनुभव समजून आजचा
उद्या फुलू द्या नवा ताटवा.
