STORYMIRROR

kishor chalakh

Others

3  

kishor chalakh

Others

बाप

बाप

1 min
466




कष्टकरी बाप माझा

जणू कुठं हरवला

वृध्द आश्रमात मला

आता दिसाया लागला


नको झालयं पोरांना

प्रेमरुपी हि सावली

स्वार्थामध्ये आता त्याच्या

नाती अशी दुरावली


मायरुपी हा ओलावा

मनातून असा गेला

जागी बापाच्या प्रेमाच्या

तिरस्कार हा उरला


माझा कष्टकरी बाप

वृध्दाश्रमी विसावला

प्रेमरूपी हा जिव्हाळा

कायमचा दुरावला



साहित्याला गुण द्या
लॉग इन