Become a PUBLISHED AUTHOR at just 1999/- INR!! Limited Period Offer
Become a PUBLISHED AUTHOR at just 1999/- INR!! Limited Period Offer

Manisha Awekar

Others

3  

Manisha Awekar

Others

बाप

बाप

1 min
191


बाप म्हणजे खरंच , शीतल चंद्र असतो

आई नावाच्या सूर्याने , तो पूर्ण झाकला जातो    (1)


आईची प्रेममहती , सर्वजण मानतात 

बापाच्या ह्या काळजाला , फार थोडे जाणतात     (2)


नित्यचि भार वाहतो , घराचा नि बाहेरचा

दाखवत नाही कुणा , बडेजाव ह्या कामाचा       (3)


लळा जिव्हाळा लावतो , मुलांना मनापासून 

वेळप्रसंगी स्वतःच्या , सुखाचा त्याग करुन       (4)


भाव , भावना ,प्रेमाचे , नाही करी प्रदर्शन 

प्रत्यक्ष थेट कृतीचे , घडवी बाप दर्शन           (5)


चिमण्या बालजीवांना , गोडीने जीव लावतो  

कर्तव्यात नेहमीच , तो अग्रेसर असतो          (6)


लेकीच्या लग्नात तो , खरंच नारायण असतो

सर्व आघाडींवर तो , भान विसरुन लढतो      (7)


लेक सासरी जाताना , डोळ्यांना ये महापूर

कन्यादान करताना , भरुन येतसे ऊर        (8)


कधीच नसते त्याला , अपेक्षा स्तुतीसुमनांची

नित्य उपासना त्याची , निरपेक्षचि कर्माची    (9)


मनापासून वंदावे , अशी बापाची थोरवी

अपार माया त्याची , शब्दांत किती वर्णावी ?     (10)


Rate this content
Log in