STORYMIRROR

Vijay Sanap

Others

4  

Vijay Sanap

Others

बाप(अष्टक्षरी)

बाप(अष्टक्षरी)

1 min
27.6K


मह्या बापाच्या खांद्याले

होता गरीबीचा जाळ

रोज राबतो शेतात

त्याची माती संगे नाळं ।।

रानी शिवार फुललं

मोती शिंपले वावरा

बाप उभा बांधावर

करे पाखराले मारा ।।

मनी बापाच्या काळजी

कशी होईन रे सुगी

खळं माय सावरूनी

पाटी भरी बिगी बिगी ।।

बाप मायीचा आधार

माय बापाचा आसरा

यांचा सुखाचा संसार

दोघा एकच कासरा ।।

बाप राबतो म्हणून

घरा मिळत रे सुख

नाही आठवत कोणा

त्याच्या मनातलं दुःख ।।


साहित्याला गुण द्या
लॉग इन