STORYMIRROR

Shila Ambhure

Others

2.2  

Shila Ambhure

Others

बाप (अभंग)

बाप (अभंग)

1 min
35.8K


रूपवान खास

सद्गुणांची खाण

घराण्याची शान

बाप माझा।।1।।


दीनांचा कैवारी

दुर्बलांचा दाता

मजुरांचा नेता

बाप माझा।।2।।


पैशाने गरीब

श्रीमंत मनाचा

लाडका जनाचा

बाप माझा।।3।।


नसताना आई

अखंड धरीली

मायेची सावली

शिरावरी।।4।।


मुलगी जरी मी

केले सुसंस्कार

लाडही अपार

केले माझे।।5।।


कष्ट केले बहु

लपवुनि आसू

फुलविले हसू

माझ्या ओठी।।6।।


पायांवर उभी

सक्षम या जगी

बनले उद्योगी

बाबांमुळे।।7।।


हाच बाप मिळो

जन्मोजन्मी मला

प्रार्थना देवाला

करिते मी।।8।।


साहित्याला गुण द्या
लॉग इन