बालपण
बालपण
1 min
239
निरागस हास्य
नेहमी चेहरी
अद्वैत ते रूप
असे घरोघरी
ना चिंता ना ताण
स्वच्छंद ते जगा
हेवा दावा नसे
कशाचाच उगा
प्रत्येक क्षण तो
हसत खेळत
सवंगड्यात हो
रमत गमत
रुसायचे कधी
हट्टही करावा
बालपण काळ
पुन्हा हो मिळावा
