बालपण
बालपण
निरागस, अवखळ
स्वतःच्याच विश्वात रमावे
असे ते बालपण
ना कशाचेच तेथे देखावे.....
हसरे ते बालपण
ना चिंता कशाची
रंगत आणतात खेळातून
संगत असते मित्रांची.....
अल्लड ते बालपण
भातुकलीच्या खेळात रमते
मित्रांसवे छान सजते
मन भरून आनंद लुटते....
शांत तेही बालपण
थांग मनाचा समजेना
काय चाललय मनी
काही केल्या उमजेना.....
रम्य ते बालपण
आईबाबांच्या कुशीतले
आजीआजोबांच्या मायेतले
भावंडांच्या संगतीतले.....
अवखळ अल्लड बालपण
धुंद वार्यावर तरंगतेय
फुलापानांच्या संगतीत
पाखरू होवून फिरतेय.....
वारा जसे ते बालपण
स्वप्नांच्या हिंदोळ्यावर बसतयं
पावसात चिंब चिंब भिजतयं
इंद्रधनूवर झोके घेतयं.....
