बालपण
बालपण
आठवते अजून ते
दाराबाहेरचे खेळ ।
कधी लंगडी खो खो
तर कधी काचबांगडीचा खेळ।
कधी लिंगोरचा, तर
कधी पकडापकडी।
हल्ली तर घरात मोबाईल घेऊन
सगळ्यांचे सेल्फीने तोंडे वाकडी।
सागरगोटे चंफुल पाणी
त्यात किती होती मजा
ठिकरी पाणी खेळतांना तर
एक एक घर होत होते वजा।
टायरच्या मागे आम्ही
काठी घेऊन पळायचो
कधी भातुकलीच्या खेळात
राजा राणीच लग्न लावायचो।
सरले ते बालपण परंतु
आठवणी अजूनही ताज्या
आताची लेकरे मात्र खेळत नाही
मोबाईलवर गेम खेळण्यात त्यांना
वाटती मजा।
कधी वाटत बालपण माझे
मला परत देरे देवा।
जबाबदारीतून मुक्त होऊ दे
आईचा हाताने प्रेमळ धपाटा हवा।
