बालपण
बालपण
1 min
124
कधी हसने असावे,तर कधी रडणे असावे,
पण बालपण हे प्रत्येक क्षणात जगणेच असावे..
नको ती उदयाची चिंता,नको ते दडपण
नुसती असावी मस्ती अन सदैव तीची
आठवण
कधी मस्ती तर कधी धिंगाणा,
कधी अभ्यास तर,कधी येनाजना ,
असाव्या या गोष्टी नेहमीच सोबती,
नसावी कुठलीच चिंता नसावी कुठलीच भक्ती...
देव म्हणुन फक्त त्यांनाच पुजा,
जे आहेत आपले आईवडील नाही कुणी दुजा...
