STORYMIRROR

Prashant Kadam

Others

3  

Prashant Kadam

Others

बालहट्ट !

बालहट्ट !

1 min
28.4K


तो लहान मुलगा रस्त्यात

थबकल मारून बसला

जणू त्याने आईबाबां विरूद्ध

अचानक संपच पुकारला

रस्त्याने येणारे जाणारे सर्व

त्याला पाहून खूदकन हसले

बिचारे आईबाबा मात्र

मनातल्या मनातच ओशाळले



बाबांनी मग खूप समजावले

बाबा पूता करून पाहीले

काहीच उपयोग नाही झाला

सांगून सांगून तेही दमले

पण बाळ आपला तसाच

काही केल्या एकेचना

आपल्या हट्टाला धरूनच

जागेवरून तसूभरही हलेना


परत आईच पूढे झाली

गोंजारून ऊठ म्हणाली

तरीही बाळ समजेना

आपल वागण बदलेना

आई म्हणाली मोबाईल देते

सबवे सर्फर चालू करते

तसा बाळा खूदकन हसला

मोबाईल घेतल्यावरच ऊठला


आईने त्याला उचलून घेतले

बोबडे बोल बोलून

गोड मूके घेवून हसवले

हवेत ऊंच ऊचलून धरले

तसे बाळ खळाळून हसू लागले

हट्ट सोडून बाळ लाडात आले

आईच्या कूशीत रममाण झाले

अन् आपला हट्टच विसरले !!


Rate this content
Log in