बाईपण
बाईपण


हो.......ती एक स्त्री आहे
तरी ही....
हो तरी ही
झिडकारून टाकले तिने
स्त्री च्या आतले बाईपण
आणि केले मुक्त स्वतःला
बाईपणाच्या दड़पणातून
आणि घेतली नजर ही
बदलवून
जी......
सतत माझ तुझ करत होती.......
तीच्यातल्या गुण दोषा सहित
तिने त्या बाईपणाला..
केले गंगेला अर्पण ......
आणि स्वतःच स्वतःच्या
मुक्ति च्या वाटा मोकळ्या
केल्यात .....
उगाच ते गुण अंगी घेऊन
मिरवत होती,.....
काय तर म्हणे......
एका स्त्री च्या अंगी
द्वेष, इर्शा, मत्सर हे
असायलाच लागतात
नव्हे ते जन्मजात
असतातच.....
एका बाई ने दुसऱ्या
बाई ला इर्शे नेच बघीतले
पाहिजे..
.....
मग ती इर्शा कशाची ही असू देत
कपड्यांची, दागिन्यांची,
साडीची असो की गाडीची असो
की असो ती चेहऱ्याच्या रंगा ची
ती मनी असायलाच
लागते म्हणे बाई च्या.......
पण तिने धिक्कारले ते बाईपण
आणि त्या बाईपणाच्या
सो कॉल्ड गुणांना ही...
नको तिला ह्या गुणांची माळ
जी तिच्या......
एका स्त्री च्या अस्तित्वाला
फ़ास लावेल.......
तोडले तिने ते टिपिकल
बाईपणाचे साखळदंड जे
बाईपणाला फुलांचे हार वाटायचे.......
केसातील सुगंधित गजरा
वाटायचे........
ती बाईपणातून मुक्त होऊन
आता केवळ स्त्री च्या मनातील
प्रेमळ, पारदर्शक मायेचा झरा होऊन वाहते.....
ती आता फक्त आई म्हणून जगते....