आई तू अशी कशी ग!
आई तू अशी कशी ग!
1 min
237
शब्द माझे जड़ होताच
कळतात तुला साऱ्या कथा
आई तू अशी कशी ग!
जाणतेस माझ्या साऱ्या व्यथा
कुणा व्यक्त होऊन कळेना
तुला अव्यक्ततेत सारे कळे
आई तू अशी कशी ग!
मनकवडी तु सदा गळे
कधी तू माझी होतेस गुरु
कधी तू होतेस माऊली
आई तू अशी कशी ग!
सदा होतेस सावली
लेक काळजाचा तुकडा तुझ्या
देतेस हृदयपिळुन दुसऱ्यास तू
आई तू अशी कशी ग!
आयुष्यभर विरह वेदनेत जगतेस तू
कोण जाणे कुण्या जन्मीचे
नाते हे नाळे संग बांधले तू
आई तू आईच आहेस ग!
मज अनंत कर्मात सांधले तू