बाई कि मॅडम?
बाई कि मॅडम?
1 min
350
राग खुप येतो बाई कोणी म्हटले कि
मॅडम म्हटल्यास हुरळुन जातो आम्ही
अनादर होतो आमचा बाई म्हटल्यास कोणी
आदर केला असे वाटते मॅडम म्हटल्यास कोणी
मराठीचा बाणा मोडुन गेला कुठे
इंग्रजाळलेपणाची झुल पांघरून मॉर्डनतेचे झालो आम्ही आता धनी
मायेची उब 'बाई'त होती आधी
'मॅडम' म्हटल्यास डोळे वटारले जात होते आधी सर्वांचे
जाणुन घ्या आपुलकिने कोण बोलत
आणि देतो आपल्याला मान बाई, मॅडम म्हणत!!!
