बाहुली
बाहुली
2 mins
318
नाजूक अन साजूक
माझी सान बाहुली
आईने शिवलेली
घालते ती झबली.....
लाल लाल फुलांचे
झबले तिचे छान
माझ्या खेळण्यात
तिला पहिला मान...
तिला उभी करताच
झटकन डोळे उघडते
तिला आडवी करताच
पटकन डोळे मिटते...
सोनेरी,पिंगट ,रंगाची
कुरळ्या, कुरळ्या केसांची
नाजूक, नाजूक, पातळ
डाळिंबी ,लाल ओठांची.....
गोरी ,गोरी पान देखणी
गोबर्या ,गोबर्या गालाची
चाफेकळी समान सुंदर
सरळ ,सरळ नाकाची.....
दिसायला दिसते बाहूली
माझी हो खूप लहान
माझ्या एकटेपणात
साथ मला तिची महान....
माझी सान बाहुली
माझी छोटीशी परी
माझ्या अवतीभवती
सदैव असते ही खरी....
