बाबा आणि लेक
बाबा आणि लेक
1 min
414
बाबा
या शब्दातच खूप काही दडलं आहे
जगण्याचं कारण बळ ही आहे..
जगण्याचा आधार मायेची ऊब आहे
डोक्यावर हात कायमची साथ ही आहे..
खऱ्या मित्राची ओळख आणि जाण आहे
सुरक्षित वाटेल अशी हक्काची जागा ही आहे..
डोळ्यात माया आणि काळजीपोटी राग आहे
अतूट अश्या नात्याची सुरुवात ही आहे..
खूप बोलले नाही पण खूप जास्त प्रेम ही आहे
तुमच्या केलेल्या प्रत्येक कष्टाची जाण ही आहे..
पहिले मित्र ही तुम्ही आणि मायेचे छत्र ही आहे
स्वभावाने प्रेमळ आणि थोडेसे कठोर ही आहे..
