अविस्मरणीय संध्या
अविस्मरणीय संध्या
1 min
488
दाट धुसर शारद संध्या
लक्ष चांदण्या फुलविते
मृदुमुलायम आठवणींचा
मोरपिसारा फुलविते.
सखीची वेळ पुढे सरता
काटा मनी झुलतसे
भाव बदलती मनी
हुरहुर वाढतसे
दिसताक्षणी प्रिया बावरी
हर्ष उसळतसे
नजरेची भाषा उत्कट
मनीचे सांगतसे
आणाभाका अन् शपथा
भाष्य आगळेवेगळे
मोबाईल मेल याहूनी
प्रीतीभेट सुखविते
लाभता विवाहकोंदण
प्रीती पूर्ततेमधे
मीलनरात्र खुलते परि
प्रीतीसंध्या न विस्मरते
