अशी असावी कविता
अशी असावी कविता
1 min
559
अशी असावी कविता
मंत्रमुग्ध करणारी
भविष्याची प्रचारक
अनंतात भरणारी.....
कळवळा जपणारी
दया माया करूणाई
मार्गप्रस्त कविताही
सर्वांसाठी वरदाई.......
तेज, वायू, अग्नी,जल
पंचतत्व अविष्कारी
निसर्गाला ओवाळुन
टाके कविता भूवरी......
नदी झरे तळे मळे
भरे जनाची तहान
क्रांती शांती ही भरूनी
शब्द करती तारन...
शब्द तलवार जणू
चाले अती पणावरी
देती बोलका वार ती
अनमोल घातकारी.....
