अशी असावी कविता
अशी असावी कविता
1 min
724
अशी असावी कविता
अशी असावी कविता
प्रेम गूज सांगणारी
ओठ मिटून घेताना
अलगूज करणारी
अशी असावी कविता
भावनांना स्पर्शनारी
खोलवर रूजताना
परी उंची गाठणारी
अशी असावी कविता
बंध नाते जपणारी
मोरपीस फिरवोनी
वीण घट्ट करणारी
अशी असावी कविता
विविधता जपणारी
रचनेत रमताना
प्रबोधन करणारी
अशी असावी कविता
रूपे उलगडणारी
शब्द चपखल येता
एकरूप 'ती' होणारी
