अशा या निवांत वेळी
अशा या निवांत वेळी
1 min
236
दिन उगवता चिंता
जाती सतत वाढत
ऐन भर माध्यान्हाला
जाई कहर चढत
कधी मिळे समस्यांना
सूट चुटकीसरशी
कधी चिंतांचे जंजाळ
चढे भाळावरती
सायंकाळी निवांतवेळी
मन माझे बहरते
षडरिपूंचे हे ओझे
आलगद उतरते
मंद शीतल पवन
मना झुळुक सुखवे
गंध फुलांचे मादक
संवेदना उमलवे
मन नाचे झूल्यावर
मोदे मन रुणझुणे
कधी माझ्यातल्या मला
प्रेमे कौतुके पाहणे
अशा निवांत समयी
भाग्यवती मी जगती
अलवार मन होई
तळ जातसे अज्ञाती
