STORYMIRROR

Abasaheb Mhaske

Others

3  

Abasaheb Mhaske

Others

असेन मी .. नसेन मी ...

असेन मी .. नसेन मी ...

1 min
445

असेन मी .. नसेन मी तरीही 

 मना -मनात स्मृतिशेष मी ..

इतिहासाचे भग्नावशेष ...

ग्वाही देतात जसे ....

सोनेरी पर्व अगदी तसे 


असेन मी .. नसेन मी  

तरीही असेल रीत ही ....

यत्किंचितही शंका नाही 

संस्कृती संचित पुढची पिढी 

आनंदाने स्वीकरेल ही ...


असेन मी .. नसेन मी

तरीही असेल गीत ही 

अनगिणत संग साथी 

 मिळुनी सारे देऊया रे 

 विधायक असे बरेच काही ....


असेन मी .. नसेन मी 

तरीही असेल संगीतही 

प्रितपुष्प अन मीत ही 

जोवर असेल धरती 

छेडणार आम्ही जीवनसंगीत  


Rate this content
Log in