STORYMIRROR

सुमनांजली बनसोडे

Others

4  

सुमनांजली बनसोडे

Others

असेल तयारी तर

असेल तयारी तर

1 min
27.5K


येणारच असशील तर...

ये माझ्या जीवनात ...

जर ठेवणार असशील अपेक्षा

सुख ...समृद्धी मिळण्याची

तर मात्र माझा होकार नाही

पण.....

तुला माझ्या जीवनात प्रत्येक क्षणाला

स्वातंत्र्यच स्वातंत्र्य आहे. .

यासाठी मोजावी लागेल तुला

कीमंत अमाप

तुला द्यावी लागेल

प्रत्येक क्षणागणिक साथ माझी

अगदी खंबीरपणे. ...

कारण....

माझं जीवन हे

अन्यायाविरुद्ध लढणारी वावटळ आहे. .

या विरुद्ध लढताना कदाचित मी ही संपेल..

तेव्हा मात्र व्हावी लागेल तुला

हा लढा अविरत चालु ठेवण्यासाठी

या भूमीवर. ..

निळ निशाण फडकविण्यासाठी...

जर असेल तयारी...

या सर्व गोष्टी स्विकारण्याची

तर आपली आयुष्याची साथ आहे ..

जर...जर.. असेल तुझा नकार...

या सर्व बाबींना....

तर ...तर ..तर आपली ही अखेरची मुलाखत आहे. ...


Rate this content
Log in