असा हा रविवार माझा
असा हा रविवार माझा
1 min
190
असा हा रविवार माझा
नेहमी सत्कारणी लागतो
सार्यांना सुट्टीसाठी अन्
मला कामासाठी लागतो
आठवड्याचा शिन येतो
सार्यांच्याच अंगात
आम्ही मात्र नेहमी रमतो
कामाच्या रंगात
आठवड्याचा बाजार बघतो
आतुरतेने वाट माझी ...
मी भाबडी रविवारची
गोळा करते ताजी भाजी
वान्याच्या दुकानात असते गर्दी नेहमीच फार
मी मात्र सामान आणते ठरवून रविवार
रविवार म्हणजे स्पेशल बेत
हवा असतो जेवणात
आम्ही लागतो तयारीत मग
खाटखूट संमेलनात
दिवस हळूहळू झूकू लागतो
घरातील पाखरं जागी होतात
बागबगिच्यात जायच्या
तयारीला लागतात
असा रविवार येतो आणि जातो
आरामाच्या दिनी गीत कामाचे गातो
