STORYMIRROR

Rajesh Sabale

Others

4  

Rajesh Sabale

Others

असा आहे महाराष्ट्र माझा

असा आहे महाराष्ट्र माझा

1 min
333

सह्याद्रीच्या दगडावाणी कणखर, पोलादी बांध्याचा।

अन असा महाराष्ट्र माझा, बेडर निधड्या छातीचा।।


इथे जन्मले शूरवीर, पराक्रमी शिवबावणी।

धुरंधर वीरांची भूमी आपली, सांगे संतवाणी।।

ज्ञानोबाची ज्ञानेश्वरी, तशी तुकोबांची गाथा।

पंढरीच्या विठ्ठल चरणी, लोक ठेवतात माथा।।

असा महाराष्ट्र, आपला बंधूप्रेमी माणसांचा।

नव्हता जातीभेद वाद, मंदिर-मशिदीचा।।१।।


डोंगराळ माळरानावर बांधले, आमचे भुई किल्ले।

सह्याद्रीच्या कुशीत वसविले, त्यांनी गड किल्ले।।

समुद्रतटावर बांधून भक्कम, तटबंदी नवे जलदुर्ग।

नौकेत आरमार उभारले, वाहतुकीसाठी जलमार्ग।।

अभिमान आम्हा संस्कार, संस्कृती परंपरांचा।

हा इतिहास वैभव संपन्न, आपल्या महाराष्ट्राचा।।२।।


आता काय झाले आम्हा, काही समजेना उमजेना।

तीळभर सुद्धा माणुसकी,आमच्यात उरली ना।।

स्वातंत्र्यापूर्वीची समता बंधुता, आता कुठे गेली।

मठ मंदिर-मशिदीत हत्यारे,, तिथे कशी आली।।

मोडून टाका डाव धूर्त, दुष्ट कपटी वैऱ्याचा।

जातीभेद विसरून, राखा सन्मान महाराष्ट्रचा।।३।।



Rate this content
Log in