STORYMIRROR

Vijay Sanap

Others

3  

Vijay Sanap

Others

अरे पाऊस पाऊस

अरे पाऊस पाऊस

1 min
27.9K


अरे पाऊस पाऊस

का रे झाला तू ऊदास

तुह्या नावानं रडते

साऱ्या गावात माणसं...।।धृ।।

वाट पाहूनं पाहूनं

बाप महा रे थकला

तुह्या अवेळी पणानं

त्यानं माथा रे टेकला

बाप भजतो देवाला

माय करी उपवास...अरे पाऊस

कधी येतो वादळात

जसा हुंदळ्या मारीत

चम चम करे ईज

जोर धरे अंगणात

बाप निजतो जागतो

हात जोडीतो मेघास...अरे पाऊस

काळ्या मातीचं ढेकूळ

ओलं होईना रे कसं

माय मही सकाळीच

बोले देवाला नवस

बाप पाहे नभाकडे

माय पूजती तुळस...अरे पाऊस

उभा बाप बांदावरं

सारं राखतो शिवारं

आल्या गेल्या पाखराला

नाही कळतं दुपारं

चार दाणं टिपायाला

रोज धरी कणसास...अरे पाऊस


Rate this content
Log in