अरे आयुष्या...
अरे आयुष्या...
अरे आयुष्या,
एवढा कसा रे लाचार बनलास तू
अमरत्वाचं नसतानाही वरदान तुला
अमरत्वाच्या स्वप्नात रंगलास
क्षणभंगूर काहीशा सुखासाठी इतरांचा गळा
घोटायला निघालास
सुख दुःख तुझीच अपत्ये ना तरीही
सुखाचा विचार करुन दुःख का पदरी पाडतोस
या अवास्तवी दुनियेचा कधी त्रास नाही होत तुला..
की फक्त यातनांच्या डोहातच पोहायच असत तुला..
इथल्या लाचार जीवनाशी अन् मरगळलेल्या
विचारांशी न जुळताही का जुळवुन घेतलेस तू...
कधीतरी आकाशाला कवेत घेणार्या
तुझ्या नजरेनं अंतर्मनाला खुनवुन बघ..
असे तू हिमालयाएवढा आनंद गावेल तुला
आणि मग सिद्धार्थ गौतमाचं गुढ हस्य ही
येईल तुझ्या वदनी कदाचित
बघ जमलस तर क्षितीजापलीकडची स्वप्न असताना अन् मृत्यूची घंटा वाजण्यापूर्वी काढ तुझ्या अंतर्मनाचा प्रत्येक कोपरा ढवळून...
