अपघाती परी...
अपघाती परी...
मी रस्त्यावरन जात होते अलगत अनमोल क्षणाने
पण घडलं असं जे काळजात मावेना जोमाने
खरं होत की स्वप्न होत हे समजत नाही डोळ्याने
पण ते घडलं तेव्हा धडधड अनुभवली हृदयाने
मी रस्त्यावरून धावताना गाडी आली वेगाने
सुचत काही नव्हतं धडक लागेल का या जोमाने
तेव्हड्यात एक परी आली अलगत पांढऱ्या पंखाने
आणि वाचवलं तिनं मला हळुवार आपल्या हाताने
काही क्षणात ती लपली या दृष्टीच्या जोखाने
मी केवळ बघत राहले माझ्या उघड्या डोळ्याने
कोण होती काय होती समजलं नाही शब्दाने
काय होती का होती प्रश्न पाडला या हृदयाने
नव्हते विचार तरी लपली अचानक या वेगाने
थोडी अलगत थोडी गुळचट या कठोर क्षणाने
रूप मात्र डोळयांत होत थोडं साजर स्वप्नाने
मन अजूनही विचारत होत थोडं अलगत प्रेमाने
पण ती खरी परी पाहिली होती मी डोळ्याने
नव्हतं स्वप्न तरीही अनुभवली मी मात्र स्पर्शाने
ती गोरी चकोर स्त्री अलगत शिरली होती स्वर्गाने
घाबरत रडत मीच बघितली माझ्या या अनमोल डोळ्याने
