अपेक्षा
अपेक्षा
1 min
405
कशाला अपेक्षांचा मांडलाय बाजार
विचित्र विचारांचा जडलाय शेजार
कोणाकडून ठेवावी अपेक्षा
आणि कशाला करावी प्रतिक्षा
तिचं ओझं बाळगाव किती
शेवटी धूपाटन आहेच की हाती
अपेक्षेने कधी घेतली काडीमोड
सोसवेल का हो अघटित घडामोड
नका ठेवू कोणावर अपेक्षांची भिस्त
मोडून पडेल जगण्याची रोजचीच शिस्त
