Become a PUBLISHED AUTHOR at just 1999/- INR!! Limited Period Offer
Become a PUBLISHED AUTHOR at just 1999/- INR!! Limited Period Offer

Shreyas Gawde

Others

3  

Shreyas Gawde

Others

अनुभूती !

अनुभूती !

1 min
30



मी मीच आहे ; तू तूच आहे . . .


मी तुझ्यात आहे . . तू माझ्यात आहे . .


प्रकाशात अंधार आहे, अंधाराला प्रकाश आहे. .

दोघे मिळून एक अनुभूती आहे. . .


लहानपणी खेळण्यात नाती मांडायचो.. आता नात्याचा खेळखंडोबा घडवतो . . .


लहानपणी खेळाचा डाव होता; आता डावाचा कट आहे . . .


लहानपणी मिळणाऱ्या हक्काने आनंदाने बधिर व्हायचो ,

आता पाहतो तर लोकं बधिर फक्त पैशासाठी होतात. . .


रंग, वर्णभेद मी लहानपणीच मोठ्यांच्या तोंडून शिकलो

फक्त कोणाकडूनच शिकलो नाही ते...कठीण काळातही भावनांची कदर करणं. . .


रूप हे केवळ काही काळापूर्तीच मर्यादित असतं

फक्त मर्यादित नसतं ते माणसावर केलेलं प्रेम. . .


शेवटी खरा निरागसपणा तो लहानपणी आणि

आयुष्याची साथ लागते ती फक्त म्हातारपणी. . .


मधल्या काळातल्या शिदोरीत फक्त

योग्य ते कर्म करावे दुसरं काही नाही. . .


दोन्हींमधलं अंतर एक दांडगा अनुभव

आणि एक निस्सीम अनुभूती आहे. . .


लोकांना वाटतं देवासमोर दोन अगरबत्ती लावून अनुभूती मिळते

त्यांना हे नाही कळत की अनुभूती केवळ आणि केवळ आपल्या भक्तीत आणि श्रद्धेत आहे . . .



Rate this content
Log in