STORYMIRROR

Manisha Awekar

Others

3  

Manisha Awekar

Others

अंतराळ सफर

अंतराळ सफर

1 min
385

निळ्याशार नभामधे

चंदामामा बघ आला 

चांदण्यांचा फेर बघ

किती छान सजलेला


अगं दोघंजणं जाऊ

अंतराळ सफरीला

उंच जाऊन बघू ना

गोलगोल चांदोबाला


कसा होतो छोटा-मोठा

समजेल तरी मला

चंद्र बघून येताच

सारे सांगतो मित्राला


अंतराळ यानातून

उंच आकाशात गेले

धपकन् पडे राजू

" स्वप्न पडले का रे? "


Rate this content
Log in