अंतिम सत्य ( कविता )
अंतिम सत्य ( कविता )
1 min
435
मी माझे, मोह माया
गुंतून पडतो त्यात असा
कोणीच नाही कोणाचा
मी विसरतोय का कसा?
हे हवे ,ते ही हवे
धडपड किती त्यासाठी
काहीच नाही शाश्वत तरी
पसारा वाढवतो का असा?
आपलं परकं करताना
नात्यांची परवड का?
मने गुंतता दूरावा मग
साऱ्यात एकाकी कसा?
जीवन खरे क्षणभंगुर
का मन हे मानेना?
मृत्यू हे अंतिम सत्य
का सत्य हे आज पचेना?
