अनमोल साथ...
अनमोल साथ...
![](https://cdn.storymirror.com/static/1pximage.jpeg)
1 min
![](https://cdn.storymirror.com/static/1pximage.jpeg)
23.2K
आई आस
कुशीतली
साथ तुझी
उरातली...
बाबा तुझा
मिठी मेवा
आधाराचा
सदा हवा...
आजी काया
काळजीची
लावी माया
ती प्रीतीची...
आजोबांची
शिकवण
मिटे सारी
वणवण...
भाऊ प्रेम
लाडातले
देई सुख
स्वप्नातले...
बहिणीचा
बहुमान
पाठिंब्याचा
हात शान...
सहवास
मैत्रीतला
सुके वाद
अश्रुतला...
प्रियकर
सोबतीला
साथीदार
उभारीला...
नाती साथी
जीवनाला
सर्वकाळ
जपायला...
कुटुंबाचा
अनमोल
ठेवा जपे
माझे बोल...