Become a PUBLISHED AUTHOR at just 1999/- INR!! Limited Period Offer
Become a PUBLISHED AUTHOR at just 1999/- INR!! Limited Period Offer

RohiniNalage Pawar

Inspirational

4.0  

RohiniNalage Pawar

Inspirational

अंकुर-एका मुलीचा आईकडे प्रवास

अंकुर-एका मुलीचा आईकडे प्रवास

1 min
112


एका घरातली 'पणती' एक 'लक्ष्मी' बनून दुसरं घरं उजळते,

आणि ती लक्ष्मी त्या घराचा पाया बनते...||१||


पाया घट्ट करून हळूूहळू ती 'शिखर' गाठते,

एक दिवस घराला एका नवांकुरची चाहूल देते...||२||


मुलगी असते तेव्हा 'अल्लड' असते,

आई होणार समजताच हळूहळू समजूतदार होते...||३||


पहिला अंकुर असतो तो म्हणून थोडी काळजीत असते,

काही स्वतःच्या सवयी अंकुरासाठी हसत हसत सोडते...||४||


एक शरीर दोन जीव तिला सगळं माहीत असूनही त्यावेळी ते खूप कुतूहलास्पद वाटते,

आई होण्याची ती पायरी तिला खूप मजबूत बनवते...||५||


आईला समजून सांगाव्या लागणाऱ्या गोष्टी आता ती नकळतच ओळखू लागते,

आई सोबत असताना स्वतः आई होण्यात तिला जग खूपच सुंदर वाटू लागते...||६||


Rate this content
Log in