STORYMIRROR

Chandanlal Bisen

Others

3  

Chandanlal Bisen

Others

अंधश्रद्धा

अंधश्रद्धा

1 min
247

अरे मानवा तू मानवा

खूप-खूप रे शिकलास

अंधश्रद्धेवर रे तुझा

कसा प्रगाढ विश्वास !!धृ!!


भूत-प्रेत जादू रं

नाही रे या जगी

ढोंगी भगत, बुवांचे रे

तू कसा पाय लागी?

भूलथापांना रे तू

कसा बळी पडतोस?..


चमत्कार जादू रं

नाही रं या जगी

विज्ञानी प्रयोगातून

जादू दावी रं ढोंगी

मनोभावे सेवेत तू

कसा वाहतोस?..


देवी,देवता

नाही येतं रे अंगी

आकताला जातो तू

भुलून त्यांच्या ढंगी

झाडफूकाच्या आहारे

मुकतो जीवास..


जादूखोर सोदिन-डाईन

नाही रं या जगी

शंकेचे सावट असते

भास होते रे मनी

विनाकारण करतो रे

निर्दोषांचा द्वेष..


एकीसावे शतक

धर सत्याची कास

टाक पाऊल पुढं

धर शिक्षणाचा ध्यास

आळस झटकूनी

दे प्राधान्य कर्मास..


Rate this content
Log in