अंबाबाई
अंबाबाई
1 min
398
आई अंबाबाई
नवसाला पावती.
करवीर निवासी
आई भक्तांना रक्षिती.
काय वर्णावा सोहळा
आईच्या पूजेचा
रोज नवनवीन
थाट असे तीचा.
कनवाळू, कृपाळू
आई अंबाबाई
मनीषा माझी
पुरी कर आई.
अंगणी तुझ्या वाढले
पुण्यक्षेत्री बागडले
कोल्हापूर ची लेक मी
अभिमान उरी दाटले.
तुझ्या दर्शनाची
नीत अभिलाषा
पहावे मुखकमल
हीच एक मनिषा.
दैत्य संहारूनी
भक्तांसी पावशी
दर्शनाने तुझ्या
दैन्य आमचे तारीशी.
