अनाथ बालके
अनाथ बालके
1 min
252
बालके अनाथ अहो!
नसतात मुळी बरी
आई अन् बाबास
मुकतात हो खरी...
जन्मताच कोणाचे
आईबाबा देवाघरी जाई
मुलांना जपते मावशी
घरात अन्याय न होई....
बालपण हरवते जरा
आईची कूस मिळत नाही
जपतात मग आपल्यासारखे
मुलांना समजत नाही काही....
अनाथ ,दीनवाणा,परका
मुकतो आईच्या प्रेमाला
पण दत्तक घेवून ती माय
देते आधार या मुलाला....
अनाथ या मुलांचे आपण
जाणून घेवूया सदा दुःख
मायेचा हात फिरवून पाठी
देवू या मुलांना सदा सुख....
