अजब किमयागार
अजब किमयागार
1 min
213
शब्दशिल्पकार असे
कलाकार साहित्याचा
साहित्यलेणीत शिल्प
अविष्कार प्रतिभेचा
काव्य उस्फूर्त येतसे
प्रतिभेच्या स्पंदनाने
शब्दलडी लहरती
स्वरनाद झंकाराने
आविष्कार शोभतसे
शब्द लय नर्तनाने
सुख मनी लाभतसे
काव्यप्रभा खुलण्याने
लेणी सुंदर शब्दांची
प्रतिभेचे अलंकार
सार्थकता जीवनाची
नाद शब्दांचे झंकार
