अजातशत्रू
अजातशत्रू
1 min
185
नाम अजातशत्रूचे
असे ख्यात जगतात
शब्द नित पाळण्यात
सर्वमुखी तू प्रख्यात (१)
रात्री अपरात्री जासी
नित्य सर्वांना जपसी
रोग्यांसाठी तू झटसी
काम त्वरेने करसी (२)
जमे हे मैत्रबंधन
आजारपणामधेच
रान जीवाचे केलेस
इथे इस्पितळातच (३)
लाभे मज दैवे आयु
तुझ्यामुळे जीवदान
कधी ना विस्मरण
अनमोल योगदान ( ४)
कसे मानावे आभार?
शब्द थिटे पडतात
सदा कृतज्ञ मी सख्या
अश्रू नेत्री झरतात !! .(5)
