ऐकनारे मना
ऐकनारे मना
संथ वाहणार पाणी जस थांबत ना
थांब ना रे मना तुही तसाच कुठेतरी
बसु देना रे तो सुख दुख:चा गाळ खोलवर
नितळ निर्मळ हो ना रे तुही आतातरी....
आपण ना विसरुया सगळेच डाव मांडलेले
कधी जिंकलेले तर जिंकता जिंकता हारलेले...
बघुचया ना एकदाच हारुन सगळे मिळवलेले
कुणाचे तरी आनंदाने डोळे बघूया भारलेले...
ऐकनारे मना... गमवण्यातही सुख असतं
अस काय आणलय आपण???
ज्यासाठी हे वेडे मन तुटत असतं.....
एक अखेरचा च हा खेळ आपण खरचं खेळुया
जाता जाता एका तरी मनात तुला रुजवुया...
बघ ना रे मना मोह करतो सगळ्याचाच
पण मनालाही राहण्यासाठी कोपरा लागतो मनाचाच
मी तुझ्या मनात तु माझ्याच मनात रहा
एक मेकांच्या श्वासांमधुन प्राण बनुन वहा
म्हणुनच सांगते मना
खळाळून वहा....स्वच्छंदीही हो
बंध तोड सारे... कधी स्वैरही हो
पण जेव्हा थकशील भागशील तेव्हा
थोडासा विसावा घेण्यासाठी क्षणभर तरी
संथ वाहणार पाणी जस थांबत ना
थांब ना रे मना तुही तसाच कुठेतरी....
