ऐका भक्तगणांनो
ऐका भक्तगणांनो
1 min
11.6K
आलो आलो भक्तगणा
आशिर्वच तुम्हां देतो
सकलांच्या रे कल्याणा
चार गोष्टी मी सांगतो (1)
उत्सव माझा सुरु केला
लोकमान्य टिळकांनी
इच्छा एक त्यांच्या मनी
एकत्र यावे सर्व जनांनी (2)
शुद्ध पवित्र शांत स्वरुप
आता मात्र रंग बदलले
नाच गाणी धिंगाणाही
माझ्यापुढे करु लागले (3)
अचकट विचकट
गाणी नका रे लावू
थिरकत्या तालावर
नका रे असे नाचू (4)
मिरवणूकीत असावी
ढोल लेझीम पथके
कर्णकटू नाच गाणी
नकोत पिऊन धिंगाणे (5)
खर्च करा माझी वर्गणी
पूरग्रस्त लोकांसाठी
दुवे त्यांचे मिळतील तुम्हां
मदत करा दुःखितांसाठी (6)
