ऐक सखे
ऐक सखे
1 min
348
ऐक सखे सांगतो मी
गुज हे माझ्या मनीचे
मिलनाची येताच घडी
धडधडे हृदय कधीचे
फुलवूया दोघे मिळूनी
संसार वेल जीवनाची
साथ देऊ सुखदु:खात
घडी सुखी मिलनाची
प्रीतीचा बहर अंगणी
सुटावा मंदधुंद दरवळ
होताना समरस दोघेही
नको करूस खळखळ
आणिला प्रेमाने तूजला
जाईचा सुगंधी गजरा
आलो भेटण्यास सजनी
चुकवूनी साऱ्या नजरा
राहूया सुखात गं सखी
अखंड प्रेमात एकजुटीने
नको विसरू क्षण सुखाचे
होईल दु:खच ताटातुटीने
