STORYMIRROR

Sunita Anabhule

Others

3  

Sunita Anabhule

Others

ऐक सखे...

ऐक सखे...

1 min
227

ऐक सखे तू माझे स्पंदन,

छेडलीस तू तार मनोहर,

स्वप्नील सुरांचा मी पंचम

साथ दे प्रीतीची निरंतर ।। १ ।।


माझ्या जीवनाची तू सतार,

साथ दे मजला तू अपार,

कायम सोबत सुखाची बहार

वचनानंची लागेल कतार ।। २ ।।


ऐक सखे निसर्गाचे कूजन,

लपले पर्यावरणाचे रुदन,

मिळून करु वृक्ष संवर्धन,

रक्षण तयांचे कर्तव्य मानून ।। ३।।


भविष्याची ठेवून जाण,

निसर्गाचे जपून भान,

देशाप्रती राखू इमान,

वाढवूया देशाची शान ।। ४।।


Rate this content
Log in