अगं आई, सांगायच राहून गेलं तुला...
अगं आई, सांगायच राहून गेलं तुला...
अगं आई ,सांगायचं राहून गेलं तुला ...
अगं आई ,
सांगायचं राहून गेलं तुला ,
माझ्या मागे मागे करतांना ,
सारे काही हसून सोसायची ,
पण त्रास होत होता ना तुला ...
तेव्हा नाही गं कळलं मला ,
आवडी लेकरांच्या जपतांना ,
स्वतःच्या विसरते की ,
पण तरीही सुख वाटते मनाला ...
मला बरं नसले की ,
कासाविस तू व्हायची ,
काय ? हवं काय ? नको ,
ते आवर्जून पहायची ,
किती हक्काने मीही ,
अधिकार गाजवायची ...
ते सारं अगदी जसच्या तसं ,
आठवते बघ आता ,
नऊ महिन्याच्या कळा सोसुनही ,
तो स्वार्गानंद अनुभवते स्वतः ...
आई कधी म्हटलं नाही मी,
तू खूप काही शिकवलंस मला ,
अगं तु सर्रास विसरली ,
तुझे आभार कसे मानायचे ,
हे नाही शिकवलं मला ...
आणि मी धन्यवाद तरी ,
कशा कशासाठी बोलू ,
तू त्या शब्दाच्या पलीकडे आहेस ,
तूच माझ्या अस्तित्वात आहे ...
अगं आई ,
तू या रक्ताच्या थेंबा थेंबात आहे ,
तुझं काळीज आहे बघ मी ,
आणि तुझे स्पंदने ,
माझ्या काळजात धडधडत आहे ,
तू आणि मी वेगळी नाहीस ,
हे सांगायचं होतं बघ तुला ,
खरंच तू आहेस म्हणून हे विश्व आहे ,
आई तुझ्या जागी तूच आहेस ,
तुझ्या जागी तूच आहेस ...
