STORYMIRROR

Vasudha Naik

Others

4  

Vasudha Naik

Others

अधुरं स्वप्न

अधुरं स्वप्न

1 min
27.9K



वसुधाची बारावी झाली शिक्षण अर्धवट राहिले

वैभव बरोबर लग्न झाले

शिक्षणाचे अधुरं स्वप्न राहिले ॥१॥


लग्नाचे दीड वर्ष मजेत गेले

एस.पी.काॅलेजला एफ.वाय.एस.वाय केले

जुळ्या मुलींना जन्म दिला

संगोपनातच दिवस जावू लागला ॥२॥


डिग्री घेण्याचा प्रयत्न केला

पण तो असफल झाला

सध्या विचार बाजूला सारला

मुलींच्या शिक्षणाला वेळ दिला॥३॥


नंतर पोस्टल डी.एड.केले

शैक्षणिक डिग्री घेण्याचे काम केले

डिग्री मिळाली.मनासारखी नोकरी पण मिळाली॥४॥


अजुनही बी.ए.ची डिग्री हातात नव्हती ,हे स्वप्न अधुरं होते

मधल्या काळात मुलाचा जन्म झाला होता.

मग वसुधा तिघांचे संगोपन छान करू लागली

मात्र वैभवची तब्बेत ढासळू लागली॥५॥


वैभवचे शरीर अनेक आजारांचे माहेरघर

वैभव घरी बसून सांभाळतो आमचे घर

पण वैभव आहे सोशिक फार

सर्व दुखणे सहन करतो अपार॥६॥


नाही देत त्रास वसुधाला

नाही जाच तीला

नंतर मात्र वसुधाने मनाचा हिय्या केला

सन २०१० मधे बी.ए. डिग्रीचा मान मिळवला

वसुधानंअधुरं स्वप्न पूर्ण केले

आयुष्यभर माणूसपण जपले

मित्र,सवंगडी,मनापासुन जपले.॥७॥


Rate this content
Log in