अधीर श्रावण
अधीर श्रावण


बरसण्या प्रीती मेघांची,
राग अधीर गायला तु,
उमगण्या प्रीती कळीची
थेंब आधीच प्यालास तु
जगण्या प्रीती फुलांची
वेड्या अधीर झालास तु.
भिजल्या प्रीती सवे
ओलाचिंब न्हालास तु
संगे पावसाच्या धारा
झेलणारा तु,..
संगे प्राणज्योत ह
ी ,
मालवण्या आधीच संपलास तु
प्रीती उनाड वाराची ,
कळण्याआधीच वाहीलास तु,
राग मल्हार मेघांचा,
संगम दोन जीवांचं ,
जाणला न कधी तु
जगणं समोर असताना ही
श्वासात उरून राहिलास तू
होतास जरी जवळ तू
जगणं माझं संपवून गेलास तू,..